मोठी बातमी – अफवा खरी ठरली! हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट, 4 वर्षांचा संसार मोडला

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक व क्रिकेटपटू हार्दीक पांड्या यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. अखेर हार्दीकने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. हार्दीकने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नताशा व तो वेगळे होत असल्याचे सांगितले आहे. हार्दीकने एक मोठी पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

चार वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नाते टिकवायचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यातून काही निष्पण्ण झाले नाही. आम्हाला खात्री आहे की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. एकमेकांना आनंद आदर सन्मान देत आम्ही आमचे कुटुंब वाढवले. अगस्त्य हा आमच्या दोघांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. आम्ही दोघेही एकत्रपणे त्याला सर्वोतपरी आनंद देण्याचा प्रयत्न करून. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला तुम्ही समजून घ्या अशी विनंती करतो, अशी पोस्ट हार्दीकने शेअर केली आहे.

दरम्यान बुधवारी नताशा ही त्यांचा मुलगा अगस्त्या सोबत तिच्या माहेरी सर्बियाला गेली आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिकची पत्नी नताशाने एक व्हिडीओ शेअर केला होता. मी इथे बसून कॉफी पीत होते. यावेळी माझ्या मनात एक विचार आला आणि तो मला तुमच्याशी शेअर करावा, असे वाटले. लोक इतरांबद्दल किती लवकर सर्वकाही ठरवत असतात. त्यांना काहीच वाटत नाही. जर कोणी त्याच्या कॅरेक्टरबाहेर काही करत असेल तर लोक न थांबता काहीही बोलत सुटतात. यामुळे त्याची परिस्थिती काय होत असेल? याचे त्यांना काहीच वाटत नाही. पण फक्त त्याला न्याय देण्यासाठी किंवा एखाद्याला जज करण्यासाठी सर्वजण पुढे येतात, असे नताशाने त्या व्हिडीओमध्ये म्हटले.

नताशाने इंस्टाग्रामवरून तिचे पांड्या हे आडनाव हटविल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. नताशा आधी इंस्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असे नाव लावायची. मात्र दोन दिवसांपूर्वी नताशाने पांड्या आडनाव काढून टाकल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी नताशाचा वाढदिवस होता त्यावेळीही हार्दीकने तिच्यासाठी काहीच पोस्ट केले नव्हते, त्यामुळे नेटकऱ्यांना कुणकुणही होतीच.