टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात धुव्वा उडवून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा हार्दिक पुन्हा एकादा चमकला. संपूर्ण देशभरातून त्याचं कौतुक होतंय. मात्र सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान हार्दिक पांड्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरून अनेकांनी वेगवेगळे तर्क वितर्क काढले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच हार्दिकचे एका मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही मुलगी एक मेकअप आर्टिस्ट असून तिचे नाव प्राची सोलंकी असे आहे. प्राचीने अलिकडेच हार्दिक पांड्याची भेट घेतली. ती हार्दिकची प्रचंड मोठी फॅन असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले आणि हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान दोघेही खूप खुश दिसत होते. प्राचीने हार्दिकसह त्याच्या घरच्यांसोबतही फोटो काढले आहेत.
View this post on Instagram
प्राची सोलंकी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 553 हजार फोलोवर्स आहेत. मात्र हार्दिक पांड्यासोबतचे फोटो शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भावा..! ही दुसरी वहिनी आहे का? असा प्रश्न एका युजरने हार्दिकला केला. तर काहींनी better together अशी काँप्लिमेंट दिली आहे.
नताशाशी घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलनी शेअर केले पंड्यासोबत ‘ते’ फोटो; डेटिंगबाबत म्हणाली…
दरम्यान, हार्दिकची पत्नी नताशाने देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. मी इथे बसून कॉफी पीत होते. यावेळी माझ्या मनात एक विचार आला आणि तो मला तुमच्याशी शेअर करावा, असे वाटले. लोक इतरांबद्दल किती लवकर सर्वकाही ठरवत असतात. त्यांना काहीच वाटत नाही. जर कोणी त्याच्या कॅरेक्टरबाहेर काही करत असेल तर लोक न थांबता काहीही बोलत सुटतात. यामुळे त्याची परिस्थिती काय होत असेल? याचे त्यांना काहीच वाटत नाही. पण फक्त त्याला न्याय देण्यासाठी किंवा एखाद्याला जज करण्यासाठी सर्वजण पुढे येतात, असे नताशाने त्या व्हिडीओमध्ये म्हटले.