हार्दिक पांड्याने इतिहास घडवला, आयसीसी रँकिंगमध्ये ‘नंबर वन’वर पोहोचला

आयसीसीने टी-20 वर्ल्डकपनंतर आता नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. एकीकडे आयसीसीच्या टी-20 संघावर टीम इंडियाचे अधिराज्य दिसून आल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने बाजी मारली आली. हार्दीक पांड्याने मोठी झेप घेत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आघाडीचे स्थान पटकावले आहे.

यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्याने 222 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या याचे व श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा याचे गुण समान असले तरी आयसीसीने हार्दिकला प्रथम क्रमांक दिला आहे.

हार्दिक पांड्या हा पहिल्या स्थानावर असून त्या खालोखाल श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा असून तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टायनिस आहे. स्टायनिस याचे 211 गुण असून झिम्बाब्वेचा सिकंदर रझा हा 210 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.