टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत हिंदुस्थानला जेतेपद जिंकून देण्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने याने मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीचे चौफेर कौतुकही होत आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर ज्या वानखेडेवर त्याची हुर्या उडवण्यात आली होती, तिथेच त्याच्या नावाचा जयजयकारही झाला. असे असले तरी त्याच्या खासगी आयुष्यात मात्र गेल्या काही काही दिवसांपासून उलथापालथ सुरू आहे.
हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. पंड्याने वर्ल्डकप जिंकल्यानंतरही त्याची पत्नी नताशा ना सेलिब्रेशन करताना दिसली, ना तिने त्याच्यासाठी एक ओळ पोस्ट केली. त्यामुळे घटस्फोटाच्या वावड्या खऱ्या असल्याच्या शक्यतांना बळ मिळत आहे. याच दरम्यान हार्दिक पंड्याचा याचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोमध्ये तो एका रशियन मॉडेलसोबत दिसत आहे.
रशिनन मॉडेल एलेना टुटेजा हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिक पंड्या याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने हे फोटो शेअर केले आहे. हे फोटे एका जुन्हा जाहिरातीतील असून यात हार्दिक पंड्या Elena Tuteja हिच्यासोबत दिसत आहे.
View this post on Instagram
एकीकडे घटस्फोटाची चर्चा आणि दुसरीकडे रशियन मॉडेलने शेअर केलेले फोटो, यामुळे हार्दिक आणि तिच्यात काहीतरी शिजतंय का अशी चर्चा सुरू झाली. मात्र या शक्यता फेटाळून लावत एलेना टुटेजा हिने स्पष्टीकरण दिले आहे. तिने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्यासोबत फोटो शेअर केला करत मी कोणालाही डेट करत नसल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हार्दिक पंड्या आणि बिग बॉस फेम कंटेस्टंट, डान्सर नताशा स्टॅनकोव्हिच यांनी मे 2020 मध्ये लग्न केले. त्यांना अगस्थ्य नावाचा मुलगाही आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. आयपीएल आणि वर्ल्डकप दरम्यानही दोघे एकत्र दिसले नाहीत. तसेच यावर दोघांनीही अद्याप स्पष्ट भाष्य केलेले नाही.