
हिंदुस्थानी संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या ब्रेकवर आहे. तो आता कसोटी सामन्याचा भाग नाही. या ब्रेकची संधी साधत हार्दिकने आपला मुलगा अगस्त्या याची भेट घेतली. घटस्फोटानंतर पांड्या आता पहिल्यांदाच आपल्या मुलाला भेटला असून त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्याच्या मुलासोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या याने यावर्षी त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत ब्रेकअप केले आहे. दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची माहिती सोशल मीडियावर दिली होती. यानंतर पांड्याचा मुलगा अगस्त्या त्याची आई नताशासोबत निघून गेला.नताशा आणि हार्दिक यांनी कोरोनाकाळात आपले नाते जाहीर केले होते आणि मागच्या वर्षी दोनदा लग्न केले. एकदा हिंदू प्रथेनुसार आणि दुसऱ्यांदा ख्रिश्चन धर्मानुसार विवाह केला. मात्र त्यांच्यात काही मतभेद झाले आणि दोघांनी एकमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या आपल्या मुलाला भेटला नव्हता. मात्र नुकतीच त्याने आफल्या मुलाशी भेट घेतली आणि त्याला उचलून घेत आनंद व्यक्त केला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हार्दिकचा आपल्या मुलाला भेटण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. तो अगस्तयासोबत आणखी एका मुलाला कमरेवर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. कदाचित दुसरा मुलगा भाऊ कुणाल यांचा आहे. त्यानंतर हार्दिक आपल्या मुलाला गाडीत बसवतो आणि मस्ती करायला लागतो. दोघंही एकमेकांसोबत फार आनंदी दिसत आहेत.
Hardik Pandya with Agastya. ❤️ pic.twitter.com/VpOwYiPr2f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2024
एक वडिल आपल्या मुलाला अनेक महिन्याने भेटल्याचा हा व्हिडूओ भावूक करणारा आहे. हार्दिकचा मुलाला भेटण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.