
बंदीच्या शिक्षेमुळे पहिल्या सामन्यास मुकलेल्या हार्दिक पंड्याने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पाऊल ठेवले अन् पहिल्याच सामन्यात त्याला कारवाईला सामोरे जावे लागले. कर्णधार या नात्याने हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या आपल्या गोलंदाजांकडून निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने त्याला 12 लाखांचा दंड ठोठावला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हा पहिलाच गुन्हा आहे आणि हार्दिक पंडय़ाला फक्त दंड भरावा लागला आहे. याचा अर्थ हार्दिकला 12 लाख रुपयांच्या दंडासह निर्दोष सोडण्यात आले. गेल्या हंगामातही हार्दिक पंडय़ाकडून अनेक सामन्यांमध्ये अशा चुका दिसून आल्या होत्या. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत जो किमान ओव्हर रेट गुह्यांशी संबंधित आहे. त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने पंडय़ाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.