पनवेल ते सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत

पनवेल ते सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेलजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. केबलमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरुन लोकल पंधरा ते वीस मिनीटे उशीरा धावत आहेत. केबल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.