
कुर्ला स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून अचानक धुर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्यामुळे सर्व प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. सर्व प्रवासी रुळावर उतरल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. परंतु आता वाहतूक सुरळीत सुरू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.