एसटी महामंडळाला 350 कोटी; कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात

st bus
फाईल फोटो

विधानसभा निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवत महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांनाही खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. एसटीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे एसटी कर्मचाऱयांसाठी साडेतीनश कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱयांनाही 25 ऑक्टोबरपर्यंत वेतन व निवृत्ती वेतनाची रक्कमही मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने विविध सवलती देण्यात येतात. सप्टेंबर 2024 या महिन्याची सवलत मूल्याची रक्कम मिळावी अशी विनंती महामंडळाने राज्य सरकारकडे केली होती. एसटी महामंडळाच्या प्रशासनाने राज्य सरकारला याबाबतचे पत्र पाठवले होते. राज्य सरकारने महामंडळाची विनंती मान्य केली असून दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, त्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाने शासन निर्णय जारी करून एसटी कर्मचाऱ्यांना 31 ऑक्टोबर रोजी देण्यात येणारे वेतन 25 ऑक्टोबरपूर्वी वेतन व निवृत्ती वेतन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.