
दादर पूर्व बाल बजरंग वाडी येथील श्री हनुमान मंदिरात उद्या, शनिवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त ह.भ.प. कृष्णा माळकर महाराज यांचे कीर्तन, पूजा आणि अभिषेक, श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पालखी शोभायात्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, विश्वस्त प्रकाश कारखानीस, अशोक सोमाणी यांनी दिली.