Iran: हवाई हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हनीह ठार; इस्त्रायलने हल्ला केल्याचा आरोप

इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीह ठार झाला आहेत, असे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बुधवारी सांगितल्याचं स्थानिक टीव्हीच्या वृत्ताच्या आधारे जाहीर करण्यात आले आहे.

मेहेर वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात आयआरजीसीने म्हटले आहे की इस्माईल हनीह आणि त्याच्या एका अंगरक्षकाला तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं आहे. यात दोघेही ठार झाले.

‘पॅलेस्टाईनचे इस्लामिक रेझिस्टन्स ऑफ हमासच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख इस्माइल हनीह याच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. या घटनेत एक अंगरक्षक देखील ठार झाला’, असं निवेदनात म्हटलं आहे.

याआधी मंगळवारी इराणचे सर्वोच्च नेते सय्यद अली होसेनी खमेनी यांनी हमास प्रमुख इस्माईल हनीह याची भेट घेतली होती. खमेनेई सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हनीह यांच्या भेटीची छायाचित्रे देखील शेअर करण्यात आले होते.

दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण दलांनी हेजबुल्लाहचा सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडर फुआद शुकर ‘सय्यद मुहसान’ याचा खात्मा केल्याचेही जाहीर केले.

आयडीएफच्या म्हणण्यानुसार, शुक्र हा हिजबुल्लाचा कमांडर हसन नसराल्लाहचा उजवा हात होता आणि त्याने इस्रायलवरील हिजबुल्लाहच्या हल्ल्यांवेळी निर्देश केले होते. IDF ने सांगितले की तो उत्तर इस्रायलमधील मजदल शम्समध्ये 12 मुलांची हत्या तसेच अनेक वर्षांमध्ये असंख्य इस्रायली आणि परदेशी नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. आयडीएफने सांगितले की, हिजबुल्लाहच्या बहुतांश अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठीही शुक्र जबाबदार आहे, ज्यात अचूक-मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या रॉकेट आणि यूएव्हीचा समावेश आहे.