ऐकावं ते नवलच! केसगळतीचा रेकॉर्ड, महिलेने 30 हजार केस केले जमा

वेगवेगळी नाणी जमा करणे, फोटोचा संचय करून त्याचा अल्बम बनवणे काहींची आवड असते. अशा बातम्या सुद्धा अधूनमधून येत असतात. परंतु, यूनायडेट किंग्डम येथील एका महिलेने वेगळाच कारनामा करून दाखवला आहे. या महिलेचे नाव लिव रोज असून तिने गेल्या चार वर्षात तब्बल 30 हजार केस जमा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. लिवने हे काही जाणीवपूर्वक केलेले नाही.

सुरुवातीला तिला केस गळतीचा त्रास होत होता. केस विंचरताना तिच्या हाती बरेच केस येत असत. ती त्या केसांकडे पाहायची. एकदा तिने गळती झालेले केस भिंतीला चिकटवले. असं ती रोज करू लागले. नंतर तिला ती सवय लागली. तिच्या डोक्यावरील केस गळाल्यास ती त्या केसांना भिंतीवर चिकटत असत. ती रोज सकाळी उठून केस विंचारते. जे केस गळती झाले. ते केस भिंतीला चिकटवते. तिने 1 हजार 505 दिवसात जवळपास 30 हजार 826 केस भिंतीला चिकटवले आहेत.

टिकटॉक क्रिएटर्स
लिव ही एक टिकटॉक क्रियएटर्स म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तिचे टिकटॉकवर 4,47,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडीओला 38.2 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. लिव गेल्या चार वर्षांपासून हे काम नित्यनियमाने करत असून तिला आता केस गळतीची संख्या 1 लाख करायची आहे.