
तेल हे आपल्या निरोगी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. आपण अन्नासाठी तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. परंतु केवळ इतकेच नाही, तर सौंदर्यासाठी देखील तेलाचा वापर हा प्रामुख्याने करण्यात येतो. सौंदर्यासाठी तेलाचे उपयोग हे खूप आहेत. ऑलिव्ह आणि नारळ तेल त्वचेवर आणि केसांवर लावले जाते. या तेलाने मसाज केल्याने त्वचा आणि केस चमकदार होण्यास मदत होते. आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी घेण्याची वेळ येते त्यावेळी आपण जुन्या जाणत्या माणसांनी सांगितलेले उपाय करतो.
तेल आपले केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण अनेकदा आपल्या त्वचेला आणि केसांना ऑलिव्ह ऑइल लावतो. कारण ते त्वचा आणि केसांना मॉइश्चरायझेशन देते. त्यात ए, डी, ई आणि के सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेतील मुक्त रॅडिकल्स आणि केसांचा कोरडेपणा कमी करतात. आपण कोणत्याही ऋतूत नारळाचे तेल वापरू शकतो. नारळाचे तेल त्वचेला आणि केसांना थंडावा देते. कारण त्यात दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म चांगल्या प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत, ते त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास आणि केसांच्या टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करते. आपण ते गरम करून देखील लावू शकतो. नारळाच्या तेलाने मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर चमक दिसून येईल.
कोणतेही तेल लावण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
कोणतेही नवीन तेल वापरण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा.
तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
कोणतीही नवीन गोष्ट वापरण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.
तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठीच्या दिनचर्येत त्या उत्पादनांची माहिती घेतल्यानंतरच त्यांचा वापर करा.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)