Hair Care- उन्हाळ्यातील केसगळतीवर घरगुती प्रभावी उपाय!

 

उन्हाळ्यात घामामुळे केसगळती ही मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळ्यात आलेल्या घामामुळे, केसगळती फार मोठ्या प्रमाणात वाढते. केसगळतीमुळे अनेकदा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच केसगळतीवर उपाय करणे हे खूपच गरजेचं आहे. केसगळतीवर अनेक घरगुती उपाय आहेत. फक्त ते उपाय करण्यामध्ये सातत्य असायला हवं.

केसगळतीवर साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी

उन्हाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केळी आणि मध हे एक उत्तम कॅम्बिनेशन आहे. कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. केस मऊसुत होण्यास मदत होते.

 

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा.  हा रस लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.

 

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडेसे दही मिसळा आणि केसांच्या मूळाशी लावावे. केसांना चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम पर्याय  आहे.

 

अकाली केस पांढरे होणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येते. आवळ्याचा रस, लिंबाचा रस, नारळ तेल समप्रमाणात घ्यावे. या मिश्रणाने केसांच्या मूळाशी मालिश करावी. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध लागतो.