
देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कुटुंबात आयएएस, आयआरएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे आयएएस आहेत. त्यांचे छोटे बंधू मनीष कुमार हे आयआरएस अधिकारी आहेत तर त्यांच्या बहिणीचे पती उपेंद्र कुमार जैन हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची मुलगी मेधा सुद्धा आयएएस अधिकारी आहे. जावई मनीष बन्सल हे सुद्धा आयएस अधिकारी आहेत. दुसरी मुलगी अभिश्री ही सुद्धा आयआरएस अधिकारी आहे. तिचे पती अक्षय लाबरू हे सुद्धा आयएएस अधिकारी आहेत.