सवा कोटीचा गुटखा जप्त

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथून ट्रकसहीत सवा कोटीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परप्रांतीय चालकाला अटक करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी नांदगाव सदो शिवारातील एक्झिट पोल भागात पथकाने छापा टाकला. राजस्थान पासिंगचा मालवाहू ट्रक अडवण्यात आला. हरियाणा राज्यातील फिरोजपूर डेहेर येथील चालक अरमान खान (20) याला ताब्यात घेण्यात आले. तो फुटवेअर पंपनी व प्लॅस्टिक खेळण्यांच्या पंपनीच्या नावे बनावट बिल तयार करून गुटख्याची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याजवळून 1 कोटी 18 लाखांचा गुटखा व ट्रक हस्तगत करण्यात आला. पुरवठादार, तसेच खरेदीदारांचा शोध सुरू आहे.