Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील केतसून जंगल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आली आहे. येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर येथे सुरक्षा दलाचे जवान पोहोचले असता त्यांच्यात आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलाला दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती. त्यापैकी एकाला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.

Nanded News : मतदानाआधीच किनवट विधानसभेत उमेदवाराचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, कारण काय?

चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून 26 आसाम रायफल्सची एक तुकडी या भागात तैनात करण्यात आली आहे. जी दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याआधी रविवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील रविवार बाजारावर ग्रेनेडने हल्ला केला होता. ज्यात 10 जण जखमी झाले होते. यानंतर खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला होता.