जळगावमधील घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

जळगावमध्ये दोन गटांत वाद झाला आणि हिंसाचार उफाळला. या घटनेसाठी गुलाबराव पाटील जबाबदार आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की जळगावात जी घटना घडली त्याला राजकीय पार्श्वभुमी होती. या घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार आहेत असा आरोपही आव्हाड यांनी केला.

काय झालं जळगावमध्ये?
मंत्री गुलाबराव पाटील यांचा ड्रायव्हर पाटील यांच्या कुटुंबीयांना घेऊन जात होता. तेव्हा पाळधी गावाजवळ ड्रायव्हरने जोरात हॉर्न वाजवला आणि कट मारण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसेत झाले. या हिंसाचारात जमावाने दुकानं आणि गाड्यांना आग लावली.