
पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये उघडकीस आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
तापी नदीकिनारी 8 ते 10 जुगारी जुगार खेळत बसले होते. यादरम्यान पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांपासून सुटका करण्यासाठी सर्व जण झाडा-झुडुपात लपले तर दोघांनी तापी नदीत उडी घेतली.
पोहता येत नसल्याने नदीत उडी घेतलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.