
खासगी बस आणि ट्रकमध्ये धडक होऊन भीषण अपघाताची घटना गुजरातमध्ये घडली. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. कच्छमधील केरा मुंद्रा रोडवर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील मृतांची आणि जखमींची अद्याप ओळख पटू शकली नाही. पोलीस सर्वांचा ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.