
अमेरिकेतून हिंदुस्थानात पाठवण्यात आलेल्या 104 बेकायदा स्थलांतरितांमध्ये 33 व्यक्ती हे गुजराती कुटुंबातील आहेत. हे सगळे लोक वेगवेगळ्या मार्गाने बेकायदेशीरपणे अमेरिकेत गेले होते. ज्यांना आता पुन्हा हिंदुस्थानात पाठवण्यात आलं आहे. अमेरिकेतून हिंदुस्थानात पाठवताना या सगळ्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांना 36 तास बेड्यांमध्ये ठेवण्यात आलं. 7 दिवस झोपूही दिलं नाही. हिंदुस्थानात परत पाठवणात आलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ‘दैनिक भास्कर’शी बोलताना आपलं दुःख व्यक्त केलं आहे.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी हेमाजी ठाकूर यांनी सांगितलं की, ”त्यांची मुलगी आणि जावई आपल्या दोन मुलांसह पॅरिसला गेले होते. तिथे हॉटेल मालकाने त्यांना अमेरिकेला पाठवण्याचे आमिष दाखवले. हॉटेलमध्ये आणखी 15-20 लोक होते. सगळे अमेरिकेला जाणार होते. जेव्हा हॉटेल मालकाला पैशांबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की, तुम्ही अमेरिकेत पोहोचल्यावर ते द्या.”
हेमाजी ठाकूर यांनी सांगितलं की, ”आधी सर्वांना ट्रकमध्ये बसवण्यात आले. 20 तासांच्या प्रवासानंतर, त्यांना ट्रकमधून उतरवून टॅक्सीमध्ये बसवण्यात आले. सर्वांना एकाच ठिकाणी सोडण्यात आले आणि खाण्यापिण्यासाठी 2 तासांचा वेळ देण्यात आला. यानंतर 2-3 लोक आले आणि त्यांना मेक्सिकन सीमेवर घेऊन गेले. भिंतीवर दोरीची शिडी ठेवून, सर्वांना एक एक करून सीमा ओलांडण्यास भाग पाडले गेले.”
ठाकूर यांनी सांगितलं, ”हे लोक सीमा ओलांडताच त्यांना अमेरिकन सैनिकांनी अटक केली. अमेरिकन सैनिकांनी त्यांना म्हणाले की, जर तुम्ही पुढे गेलास तर गोळ्या घातल्या जातील. हे लोक पकडले गेले. आधी त्यांना काही किलोमीटर चालायला लावण्यात आले आणि नंतर त्यांना एका वाहनातून सैनिक चौकीत नेण्यात आले. मुलगी तिच्या मुलांसोबत होती, पण तिच्या पतीला दूर ठेवण्यात आले. फोन काढून घेण्यात आला. त्यांना अन्न आणि पाणी दडण्यात आलं, पण त्यांना झोपू दिले नाही. कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती.” ही संपूर्ण गोष्ट सांगताना हेमाजी ठाकूर यांना अश्रुंनावर झाले होते.