सुरतमध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांनीच रचला होता ट्रेन उलटवण्याचा कट, चौकशीत धक्कादायक खुलासा

गुजरातच्या सुरतमध्ये रेल्वे ट्रॅकशी छेडछाड करण्यात आली. शनिवारी सुरतच्या किममध्ये ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला. मात्र, 15 दिवसांतच या प्रकरणाचे पोलिसांनी गूढ उकलले. हा सगळा खेळ फक्त 3 रेल्वे कर्मचाऱ्यांनी रचला होता. प्रमोशन, पुरस्कार आणि नाईट ड्युटीच्या हव्यासापोटी त्यांनी रेल्वे रुळांमध्ये छेडछाड केली. मात्र सोमवारी पोलिसांनी तिघांचाही पर्दाफाश केला.

सूरतचे पोलीस अधीक्षक (एसपी) होतेश जॉयसर यांनी सांगितले की, सुभाष पोद्दार (39), मनीष मिस्त्री (28) आणि शुभम जायसवाल (26) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते रेल्वेच्या मेंटेनन्स विभागात ट्रॅकमन म्हणून कार्यरत आहेत. पोद्दार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शनिवारी पहाटे 5.30 वाजता कोसंबा आणि किम स्थानकांदरम्यान ट्रॅकच्या तपासणीदरम्यान हा मोठा दावा केला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले की, ट्रेन रुळावरून घसरण्यासाठी रुळाच्या एका बाजूला लवचिक क्लिप आणि दोन फिशप्लेट्स काढल्या आहेत. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांनी पाठवलाही होता.

पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. खराब झालेल्या ट्रॅकचा व्हिडीओ पाठवण्याच्या काही क्षण आधी एक ट्रेन गेल्याचे पोलिसांना आढळले. एवढ्या कमी वेळात इलॅस्टीक क्लिप आणि फिश प्लेट काढल्याचा दावा पोलिसांना संशय आला. यानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासण्यात आले. पहाटे 2.56 ते 4.57 पर्यंत त्याने अनेक मॉर्फ केलेले व्हिडिओ बनवले होते. मिस्त्री यांनी मोबाईलमधून काढलेली छायाचित्रेही डिलीट केली होती. असे दिसून आले की व्हिडिओ पहाटे 5:30 वाजता अधिकाऱ्यांना पाठवले गेले होते, परंतु ते खूप आधी रेकॉर्ड केले गेले होते.

पोलिसांनी जेव्हा तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी सांगितले की, त्यांना वाटले असे केल्याने त्यांना प्रमोशन आणि पुरस्कार मिळेल. शिवाय भविष्यातली नाईट ड्युटी दिली जाईल. सुभाष पोद्दार याच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी ती अमलात आणली.