
इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात पाच पैकी चार लढती जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठा हादरा बसला आहे. गुजरातचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. कमरेला झालेल्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे.
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात 6 एप्रिल रोजी सामना खेळला गेला होता. या लढतीत क्षेत्ररक्षण करताना ग्लेन फिलिप्स याला दुखापत झाली होती. वेदनेने कळवळत असलेल्या फिलिप्सला घेऊन फिजिओ मैदानाबाहेर गेले होते. मात्र आता त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले असून तो न्यूझीलंडला परतल्याचे वृत्त आहे. तसेच तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला आहे. ‘क्रिकबझ’ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, ग्लेन फिलिप्सने आयपीएल कारकिर्दीत 8 सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजीत 65 धावा घेतल्या असून गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या आहेत. ग्लेन फिलिप्स याला आयपीएलच्या मेगा लिलावात गुजरातने 2 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. मात्र त्याला एकदाही अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही.
IPL 2025 – माही कॅप्टन होताच सौरभ गांगुलीचे मोठे विधान, म्हणाला…
6 एप्रिलला हैदराबादविरुद्ध झालेल्या लढतीतही तो सहाव्या षटकात सब्सीट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. मात्र थ्रो करताना त्याला दुखापत झाली. यानंतर फिजिओ त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. तो सरावातही दिसला नाही. आता तो संघाला सोडून घरी परतल्याचे कळते.
धोनीचं नाव घेत पुढे पुढे करणाऱ्या रायडूला सेहवागनं सुनावलं, चूक सुधारत लाईव्ह समालोचनात म्हणाला…