संगणक ऑपरेटरची नोकरी सोडण्यासाठी तरुणाने हाताची चार बोटं कापली

संगणक ऑपरेटरची नोकरी सोडण्यासाठी एका व्यक्तीने आपली चार बोटं कापल्याची घटना गुजरात येथील सूरत येथे घडली आहे. तरुणाने आपला गुन्हा कबूल केला असून एका बॅगेतून तीन बोटे जप्त करण्यात आली, तर दुसऱ्या बॅगेत चाकू जप्त केला आहे.

मयूर तारापारा असे त्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, तरुण आपल्या एका नातेवाईकाच्या डायमंड कंपनीत संगणक ऑपरेटरची नोकरी करत होता. ती नोकरी त्याला सोडायची होती, मात्र ते सांगण्याचे धाडस त्याला होत नव्हते. अखेर त्यांने आपल्या हाताची चाकूने चार बोटं कापली. त्यानिमित्ताने त्याला संगणक चालवता येणार नाही असे कारणँ पुढे करता येईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मयूर तारापारा याने आधी पोलिसांनी सांगितले होते की, तो रस्त्याशेजारी बेशुद्धआवस्थेत पडला होता. शुद्धीत आल्यावर त्याची चार बोटं कापलेली कळली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यावेळी काळीजादू करण्यासाठी कोणीतरी ती बोटं कापली असावी असा अंदाज लावण्यात येत होता, मात्र प्रकरणाची कसून चौकशी केली असता तो तरुण खोटं बोलत असल्याचे लक्षात आले आणि त्याने स्वत:ची बोटं कापली. मयूरची कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचा गुन्हा कबूल कोला. त्याने दुकानातून चाकू खरेदी केला होता. रविवारी रात्री तो अमरोली रिंग रोड येथे गेला आणि तिथे त्याने आपली बाईक थांबवली. त्यानंतर चार बोटं कापली. नंतर चाकू आणि बोटं बॅगेत टाकून फेकून दिली. त्याचे मित्र त्याला तत्काळ रुग्णालयात घेऊन गेले. एका बॅगेतून तीन बोटे जप्त करण्यात आली, तर दुसऱ्या बॅगेत चाकू सापडला.