
भरमसाट पैसा कमविण्यासाठी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्यासाठी डंकी मार्ग सर्रास वापरला जातोय. गुजरातमधील ए. सी. पटेल नावाच्या एका व्यक्तीनेसुद्धा याच मार्गाने अमेरिकेत घुसखोरी केली. तो एवढय़ावरच थांबला नाही तर तो बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानी नागरिकही बनला.
मोहम्मद नजीर हुसैन असे नवे नाव धारण केलेल्या गुजरातमधील या तरुणाला अमेरिकेने मायदेशी पाठवले. अमेरिकेने 12 फेब्रुवारी रोजी त्याला लष्कराच्या विमानाने मायदेशात धाडले. ए. सी. पटेल हिंदुस्थानात परतताच दिल्ली पोलिसांनी विमानतळावरूनच त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अनेक गुह्यांची नोंद आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून बरीच माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.