गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या जंगल सफारीत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. एका बिबटय़ाने हरणावर झडप घालून त्याला ठार केले, तर अन्य सात हरणांचा भीतीने मृत्यू झाला.‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या जंगलात बिबटय़ा घुसण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2 जानेवारी रोजी ही घटना घडली. बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हरणाची शिकार करण्यासाठी बिबटय़ा पार्कमध्ये घुसला होता. बिबटय़ाने एकाची शिकार केली. सात हरीण भीतीने मरण पावले. असे एकूण आठ हरीण मेल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर सफारी पार्क 48 तासांसाठी बंद करण्यात आले. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर शनिवारी सफारी पार्क पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पर्यटकांसाठी जंगलाच्या मधोमध सफारी पार्क बनवण्यात आलेय. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.