गुजरात सरकारची नाचक्की, अदानींना दिलेली 108 हेक्टर जमीन परत घेणार

gautam-adani

देशातील बंदरे, विमानतळे अदानींच्या घशात घालणाऱया गुजरात सरकारवर कच्छ जिह्यात मुंद्रा बंदराजवळ अदानी समूहाला दिलेली सुमारे 108 हेक्टर जमीन परत घेण्याची नामुष्की ओढवली.  जनावरांच्या कुरणासाठी असलेली ही जमीन गुजरात सरकारने 2005 मध्ये अदानी समुहाच्या एका कंपनीला दिली होती. खुद्द गुजरात सरकारनेच याबाबतची माहिती गुजरात उच्च न्यायालयाला दिली.

नवीनल गावातील ही कुरणाची 231 एकर जमीन अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडला परस्पर देण्याच्या निर्णयाविरुद्ध गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.