पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम हा नव्या आजार पसरत चालला आहे. या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. यापैकी काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एकूण 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एकाच दिवसांतच 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. या एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये आरोग्य विभागाकडून 25 हजार, 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यात झपाट्याने वाढणाऱ्या या आजारावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसल्याचे त्यांनी सांगितले. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर या आजाराचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकानेच स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य विभागाने देखील योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे आदेश प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण झालेल्या सीएचा सोलापुरात मृत्यू