विमा घेणाऱ्यांना दिलासा नाहीच, 18 टक्के जीएसटी द्यावाच लागणार

हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्यांना कुठलाही दिलासा सरकारने दिलेला नाही. यावर एक समिती गठित झाली असून नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

दिल्लीत आज जीएसटीची बैठक पार पाडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात कॅन्सरच्या औषधांवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. विम्यावर घेतल्या जाणाऱ्यावरही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. विम्यावर सरकार 18 टक्के जीएसटी आकारतं. विम्यावरचा जीएसटी माफ करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून केली होती. यावर आज जीएसटीच्या बैठकीत चर्चा झाली. बिहारचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ऑक्टोबर अखेपर्यंत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सीतारमण यांनी दिली आहे.