जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण

डिसेंबर 2023 मधील जीएसटी कलेक्शनचे आकडे केंद्र सरकारने जारी केले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, डिसेंबरमधील जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये झाले आहे. वार्षिक आधारावर जीएसटी कलेक्शनमध्ये 10.28 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये सरकारी खजिन्यात जीएसटीद्वारे 1.50 लाख कोटी रुपये जमा झाले होते. गेल्या तीन महिन्यांत जीएसटी कलेक्शन कमी राहिले. नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.68 लाख कोटी रुपये होते. तर ऑक्टोबरमध्ये हे कलेक्शन 1.72 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच लागोपाठ तिसऱया महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. डिसेंबर रेव्हेन्यूमध्ये सीजीएसटी 30,443 कोटी रुपये, एसजीएसटी 37,935 कोटी रुपये आणि आयजीएसटी 84,255 कोटी रुपये आहे.