बँकांकडून भरमसाट कर्ज घेतले, परंतु ते न फेडता बँकांना चुना लावणाऱया लोकांची माहिती समोर आली आहे. देशातील 580 लोकांनी देशातील वेगवेगळय़ा बँकांना तब्बल 3.16 लाख कोटी रुपयांना चुना लावल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 3 लाख कोटींहून अधिक रक्कम बुडवली आहे, असे केंद्र सरकारने लेखी उत्तरातून ही माहिती दिली. बँकांचे 3.16 लाख कोटी रुपयांचे एनपीए झाले आहे. कर्जदारांनी पैसे घेतले, परंतु त्याची परतफेड केली नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले. ही रक्कम बँकांच्या एकूण थकीत कर्जाच्या 3.09 टक्के इतकी आहे, असेही म्हटले आहे. पेंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
कर्जबुडव्यांकडून 3.55 लाख कोटी वसूल
रिर्झव्ह बँक इंडिया (आरबीआय)च्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पीएसबी आणि खासगी बँकांचा एकूण एनपीए 3 लाख 16 हजार 331 कोटी आणि 1 लाख 34 हजार 339 कोटी रुपये होता. बँकांसह कर्जदारांकडून आतापर्यंत 3.55 लाख कोटी वसूल केले आहेत. या प्रकरणांमध्ये बँकांसह कर्जदारांचा एकूण दावा 11.45 लाख रुपये होता. याचाच अर्थ एकूण कर्जाच्या रकमेपैकी खूपच कमी रक्कम वसूल झाली आहे. याचाच अर्थ बँकांना हे पैसे अद्याप वसूल करता आले नाही. बँकांनी 580 जणांना कर्जबुडवे म्हणून घोषित केले आहे.