हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा केला. सरकारी आस्थापना, बँका तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी माणसाला हक्काची नोकरी मिळाली. या कर्मचाऱयांच्या समस्या सोडवून स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेनेने त्यांना न्याय मिळवून दिला. ज्यांच्या प्रेरणेने हा लढा उभा राहिला ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध आस्थापनांतील कर्मचाऱयांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. हॉटेल ग्रॅण्ड हयातमधील कर्मचाऱयांनीही शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
भारतीय कामगार सेनेच्या वतीने हॉटेल ग्रॅण्ड हयातमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते आमदार सचिन अहिर, अजित साळवी, माजी महापौर महादेव देवळे, श्रीधर पाटणकर, जीवन कामत, सुनीता धुमाळ, अपर्णा आंगचेकर, भारत गीते, विशाल शिंदे, सुधार समितीचे माजी अध्यक्ष सदा परब, बाळकृष्ण गटे, उपनेते अमोल कीर्तिकर, जयदीप हांडे, प्रशांत घाडीगावकर, अभिषेक, विभाग संघटक संजना मुणगेकर, शाखा संघटक शाखा क्र. 170 सोनाली म्हात्रे, शाखा संघटक शाखा क्र. 149 हर्षदा लगारे, शाखा संघटक शाखा क्र. 168 श्वेता संसारे, मेघना पाचकुडे, कुर्ला विधानसभा प्रमुख दिलीप शिंदे, उपविभागप्रमुख संदीप गावडे, नंदकुमार जाधव, शाखाप्रमुख दिलीप मोरे, कार्यालय प्रमुख शाखा क्र. 168 दिनेश माने, ताज लॅण्ड्स एण्ड कमिटी, हयात रिजन्सी पुणे कमिटी, हयात रिजन्सी मुंबई कमिटी, एमसीए कमिटी तसेच व्यवस्थापनाकडून ज्युपिटर हॉटेलचे अमित सराफ, रेखा केळसकर, जनरल मॅनेजर रॉबर्ट डालीमीर, एचआर राहुल सिंग, फायनान्सकडून विजय हकसाली, शिखा खन्ना, अनिकेत सकपाळ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विशेष आयोजन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी केले. युनिट कमिटीचे प्रशांत नाईक, अभय प्रभू, सिद्धेश पांढरकामे, संदेश परब, संजय पातये, प्राजक्त तेली, कुश गवस, हीना शेख, मेघना पांडीलवार, महादेव पाटील, हिमांशू पावसकर, पांडुरंग कोकरे, अजय सोनावणे, गौतम तांबे, हेमंत धवल यांनी विशेष सहकार्य केले.