
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे वयाच्या 93 व्या वर्षी नवसारी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. गांधीवादी विचारसरणी असलेल्या नीलमबेन यांनी महिला आणि मानवी कल्याणात मोलाचे योगदान दिले होते. नीलमबेन या त्यांच्या मुलासोबत म्हणजेच डॉ. समीर पारीख यांच्यासोबत नवसारी येथे राहत होत्या. त्या महात्मा गांधी यांचे पुत्र हरिदास गांधी यांच्या नात होत्या. वीरवाल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.