कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय

कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येणार आहे.

या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रीप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीसंदर्भात आशिष शेलार यांच्याकडे मंत्रालयात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.