शिवकालीन व ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उद्घाटन

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवकालीन व ऐतिहासिक एकदिवशी शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज रविवारी करण्यात आला. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पारंपरिक वाद्य व ढोल-ताशांच्या गजराने परिसर यावेळी दणाणून निघाला.

नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले संग्रहालयाने संग्रहित केलेल्या एकूण 300 शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्राचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. शहरातील शिवप्रेमींसाठी संपूर्ण दिवसभर हे शस्त्र प्रदर्शन खुले असल्याचे तरुण व युवकांनी शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. प्रत्येक शस्त्राची माहिती घेण्यात येत होती.

सध्याच्या तरुणांना शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्रांची जाण नाही. छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्यातील सैनिक प्रचंड वजनदार असलेल्या शस्त्रांसह कसे युद्ध करत होते, याची जाणीव हे प्रदर्शन पाहिल्यानंतर झाली. प्रेरणा, शक्ती, ऊर्जा आणि ताकद या प्रदर्शनातून मिळाली असल्याची भावना अंबादास दानवे यांनी यावेळी अवत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर संघटक सचिन तायडे यांनी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विजय वाघमारे, संतोष खंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, शहर संघटक सचिन तायडे, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, उपशहरप्रमुख सुरेश पवार, प्रकाश कमलानी, राजेंद्र दानवे, संजय हरणे, नितीन पवार, बापू कवळे, सुगंधकुमार गडवे, बापू पवार, श्रावण उधाघे, जयसिंग होलिये, अनिल लहाने, प्रमोद ठेंगडे, प्रवीण दुबिले, गोरख सोनवणे, अनिल थोटे, राहुल थोरात, गणेश मोगल, सलीम खामगावकर, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, शहर संघटक सुनीता औताडे, सुनीता सोनवणे, सुचिता आंबेकर, अरुणा पुणेकर, रेखा वाहटुळे, अनिता पाटील, शारदा घायवट, नुसरत जहाँ, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, अविनाश अग्निहोत्री, दिनेशराजे भोसले, नंदू लबडे व रणजित दाभाडे उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगरात वाघनखांचे प्रदर्शन भरवावे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुटुंबीयांचे जन्मगाव छत्रपती संभाजीनगर आहे. राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचे प्रदर्शन भरविले जात असून, शिवरायांच्या मूळगावी छत्रपती संभाजीनगरातच प्रदर्शन भरवले जात नाही. हे प्रदर्शन संभाजीनगरात भरवले जावे, अशी मागणी दानवे यांनी केली.

प्रदर्शनातील ठेवलेले शस्त्र

हिंदवी स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल नाणी शिवराई, शिवरायांची दुदांडी नाणी, रायगडी शिवराई, पेशवे कालीन मराठा नाणी, खंडा तलवार, गुर्ज मराठा धोप, विजयनगर साम्राज्य कट्यार, वाघनखे, ब्रिटिश तलवार, भाला, कत्ती तलवार, मराठा तलवार, मुघल तलवार, माडू, दांडपट्टा, ढाल, तोफगोळा, तोफ, कुलपी गोळा, जबरदंड, जननाळ, तेगा तलवार, मराठा कट्यार, मुघल कट्यार, गड किल्ल्याचे कुलूप, कुकरी, अंकुश, चिलानम, बिचवा, धनुष्यबाण, राजपूत तलवार, खंजराली, जंबिया व गुप्ती असे एकूण 300 शिवकालीन व ऐतिहासिक शस्त्रे यावेळी प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.