सांताक्रूझमध्ये भरणार भव्य व्यंगचित्र महोत्सव

कार्टूनिस्ट्स कंबाईन या संस्थेतर्फे 5 आणि 6 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे व्यंगचित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला शिवसेना नेते सुभाष देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संस्था असलेल्या कार्टूनिस्ट्स कंबाईन या संस्थेची स्थापना 1983 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे केली.

या संस्थेतर्फे दरवर्षी विविध शहरातून भव्य व्यंगचित्रकार संमेलने घेतली जातात. व्यंगचित्र प्रदर्शन, व्यंगचित्र स्पर्धा, व्यंगचित्र विषयक प्रशिक्षण देणारी नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकासह व्याख्याने, परिसंवाद असे या व्यंगचित्र संमेलनाचे स्वरूप असते. रसिकांना स्वतःचे कार्टून काढून घेण्याची संधीही या संमेलनात मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कार्टूनिस्ट्स पंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्राr, शिवसेना आमदार संजय पोतनीस, ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी केले आहे. रसिकांसाठी हे व्यंगचित्र प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.