
मुंबईतील केईएम रुग्णालयासह राज्यभरातील रुग्णालयांची महात्मा फुले आणि आयुष्यमान योजनेची थकीत बिलांची रक्कम येत्या आठ दिवसांत सरकार देणार आहे. त्याचबरोबर दक्षता समितीही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. विधान परिषदेत सदस्य सुनील शिंदे यांनी केईएमसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात हृदयविकारांवरील शस्त्रक्रियांसाठी महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान योजनेची बिले गेली सहा महिने थकलेली असल्यामुळे शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे ही बिले लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली होती.