लाडक्या बहिणींच्या प्रसिद्धीवर तीन कोटींची उधळपट्टी

राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा आणि राजकोषीय तूट असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेची अधिक आक्रमकपणे प्रसिद्धी करण्याची योजना महायुती सरकारने आखली आहे. या योजनेची सोशल आणि डिजिटल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

लोकसभेला महिला वर्गाच्या नाराजीचा महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ आणली. सध्या महायुती सरकारला ‘लाडकी बहीण योजने’वर होणारा खर्च परवडनेसा झाला आहे, पण तरीही दीड हजार रुपयांऐपजी 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची  छाननी सुरू करून अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे ठरवले आहे, मात्र या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्य़वधीची उधळपट्टी सुरू आहे.