
राज्यातील फडणवीस सरकारकडून मिळालेली लाडक्या बहीण योजनेतील 1500 रुपयांची ओवाळणी पेंद्रातील लाडके मोदी सरकार मात्र महागाईचे ‘गिफ्ट’ देऊन दुसऱया हाताने काढून घेत आहे. या वेळेस घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरची दरवाढ करून आपल्या लाडक्या बहिणींना पेंद्र सरकारने ‘खूशखबर’ दिली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या दरवाढीचे कारण दिले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होत असताना त्यात दर कमी करण्याची तसदी मोदी सरकारने घेतलेली नाही. उलट तेलाच्या किंमतवाढीची टांगती तलवार सर्वसामान्यांवर आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना 2,100 रुपये करण्याचे आश्वासन सत्तेत आल्यानंतर हवेत विरल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यात आता सिलिंडरच्या किमती वाढवून मोदी सरकारने सर्वसामान्यांना झटका दिला आहे.
उद्यापासून नवे दर लागू होतील. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत 503 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 553 रुपयांना मिळेल. तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर 803 रुपयांवरून 853 रुपये इतका झाला आहे.
मुंबईत सध्या गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये आहे ती आता 852.50 रुपये होईल. गेल्या वर्षी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली होती. यंदा महिला दिनानंतर हे गिफ्ट परत घेतले आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे ही दरवाढ केल्याचे कारण त्यांनी दिले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने दिलासा मात्र दिला नाही.
पेट्रोल–डिझेल दरवाढीची टांगती तलवार
पेंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करत आणखी एक झटका दिला. हे बदल मंगळवारपासून लागू होतील. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ होणार नाही, असे तेल कंपन्यांनी सांगितले असले तरी पूर्वेतिहास पाहता दरवाढीची टांगती तलवार राहणार आहे.