
नागपूरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर आता विधानभवनाच्या हिरवळीवर विधिमंडळाच्या दोन्ही सार्वभौम सभागृहांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या संगीत रजनी आणि स्नेहभोजनाचा आनंद सरकार घेत आहे. आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी महाराष्ट्राची सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणा-या मंत्र्यांने राज्यसरकारच्या मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे.नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे, अशी टीका काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
रोम जळत असताना निरो व्हायोलीन (फिडेल) वाजवत होता.
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे.
आज विधानभवनाच्या हिरवळीवर विधिमंडळाच्या दोन्ही सार्वभौम सभागृहांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या संगीत रजनी आणि स्नेहभोजनाचा आनंद सरकार घेत आहे.
आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी… pic.twitter.com/OBVNwY3kQt
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) March 19, 2025
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रोम जळत असताना निरो व्हायोलीन (फिडेल) वाजवत होता. नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे. आज विधानभवनाच्या हिरवळीवर विधिमंडळाच्या दोन्ही सार्वभौम सभागृहांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या संगीत रजनी आणि स्नेहभोजनाचा आनंद सरकार घेत आहे. आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी महाराष्ट्राची सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणा-या मंत्र्यांने राज्यसरकारच्या मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे, अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली आहे.