आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी दिसणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यावर 1966मध्ये घालण्यात आलेली बंदी मोदी सरकारने उठवली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारचा आदेशच सोशल मीडियावर व्हायरल करून ‘आता नोकरशहा अर्ध्या चड्डीत दिसतील’ अशी बोचरी टीका केली आहे.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948मध्ये तत्कालीन गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यानंतर चांगल्या वर्तनाच्या हमीवर ही बंदी हटवण्यात आली. 1966मध्ये सरकारी कर्मचाऱयांच्या संघ कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली. जनसंघाच्या सरकारने ही बंदी उठवली होती. त्यानंतर 1980मध्ये इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर पुन्हा ही बंदी लागू करण्यात आली. 9 जुलै रोजी मोदी सरकारने ही बंदी घटनाबाहय़ असल्याचे कारण पुढे करून उठवली.