
गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीतून सरकारने 61,500 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. हा टोल 2023-24 च्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशच्या गंगा, यमुना, पूर्वांचल एक्सप्रेस वे आणि महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गसारख्या एक्सप्रेस वे आणि हायवेवरील टोलमधूनही सरकारने जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा टोल मिळवला. नॅशनल हायवे, एक्सप्रेसवे, राज्य हायवेवरील मिळून फास्टॅगद्वारे एकूण 72 हजार कोटी रुपये कमावले.