
केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 या महिन्यात जीएसटीतून 1.96 लाख कोटी रुपये कमावले आहेत. वार्षिक आधारावर यामध्ये 9.9 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीतून 1.78 लाख कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सरकारने जीएसटीतून अनुक्रमे 1.96 लाख कोटी आणि 184 लाख कोटी रुपये कमावले होते. 2024-2025 या आर्थिक वर्षात जीएसटीतून 19.56 लाख कोटी रुपयांची कमाई सरकारला झाली आहे.