सरकारने जर दखल घेतली असती तर लाँग मार्च काढण्याची गरज भासली नसती, असं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून आज आंबेडकर अनुयायांनी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढला आहे. याचदरम्यान बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई म्हणाल्या आहेत की, ”एक महिना उलटून गेला आहे. 32 दिवसांपासून माझे बंधू आणि भगिनी आंदोलन करत आहेत, कोणीही येथे येऊन त्यांची विचारपूस केली नाही. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी घेतला.”
त्या म्हणाल्या, ”हे लोक (सरकार) आपली दखल घेत नसून आपल्याकडे लक्षही देत नाही. यांनी अनेकांना अपंग केलं, सोमनाथचा बळी घेतला. चार दिवसांत यांनी माझ्या मुलाचा बळी घेतला, सरकार का याची दखल घेत नाही? आज जर त्यांच्या पोटचं मुलं गेलं असतं तर त्यांना कळलं असतं. सरकार दखल घेत नसल्याने आज लॉन्च मार्च काढावा लागत आहे.”
शांततेत हे अंदोलन करावं, असं आवाहन यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने आंदोलकांना केलं. माझ्या बांधवांना आणि मुलाला ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.