गोपाळ पेडणेकर यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक गोपाळ पेडणेकर यांचे आज निधन झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. ते दहिसरचे पहिले शाखाप्रमुख होते. प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती. ते बाटलादेवी मंदिराचे संस्थापक आणि अध्यक्ष होते त्याचबरोबर ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.