मध्य प्रदेशात गुंडांकडून दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न, महिला सुरक्षेचा मोदींचा दावा फोल

रस्ता बांधकामाला विरोध केला म्हणून दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील रिवा जिह्यात घडला आहे. याबाबतचा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला असून महिला सुरक्षेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा पुन्हा फोल ठरला आहे. ट्रकमधून या महिलांवर मुरूम टाकला जात असल्याचे तर महिला आक्रोश करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, याआधी या महिलांना मारहाणही करण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार राजेश सिंह नावाचा व्यक्ती रस्ता बांधण्यासाठी जेसीबी आणि मातीने भरलेला डंपर घेऊन या जमिनीवर पोहोचला होता. आशा पांडे आणि ममता पांडे यांनी ही जमीन आपली असल्याचा दावा करत दोन्ही महिलांनी बांधकामाला विरोध केला होता.

मध्य प्रदेशात घडलेली ही घटना अत्यंत लाजीरवाणी आहे. मात्र  मोदी नेहमीप्रमाणे गप्प आणि आपल्याच जीवनात मस्त आहेत, असा सणसणीत टोला काँग्रेसने लगावला आहे.