गुगल मेसेजमध्येही ’डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’चा पर्याय लवकरच

गुगल मेसेजमध्ये लवकरच व्हॉट्सअॅपसारखे ’डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ फीचर येणार आहे. गुगल मेसेजेस एका बहुप्रतिक्षित फीचरवर काम करत असून सर्वांसाठी मेसेज डिलीट करणे शक्य होणार आहे. वापरकर्त्याला नको असलेला मेसेज तो माघारी घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा असून संबंधित मेसेज हटवण्यासाठी 15 मिनिटांच्या आत डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन करावा लागेल. या कालावधीनंतर वापरकर्ते व्हॉट्सअॅपप्रमाणे केवळ स्वतःच्या डिव्हाइसमधील मेसेज डिलीट करू शकतात. त्यांना पुढे पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार नाही. विशेष म्हणजे गुगल मेसेजेसची नवीन आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांनाच केवळ या फीचरचा लाभ घेता येईल. हे फीचर कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण, नजीकच्या काळात लवकरच वापरकर्त्यांसाठी फीचर उपलब्ध असेल.