गुगलचे एआय वेदरनेक्स्ट मॉडल लाँच

गुगलने डीपमाइंड आणि गुगल रिसर्च टीमच्या मदतीने एक नवीन अत्याधुनिक एआय हवामानाशी संबंधित वेदरनेक्स्ट मॉडल लाँच केले. या मॉडलमुळे आता हवामान जाणून घेता येईल. यामध्ये एआयचा वापर करण्यात आल्यामुळे योग्य हवामान, वादळ, बर्फवृष्टी आणि पाऊस याची माहिती कळू शकेल. गुगलने वेदरनेक्स्टअंतर्गत दोन प्रमुख एआय मॉडल सादर केले आहेत. यामध्ये एक वेदरनेक्स्ट ग्राफ आणि वेदरनेक्स्ट जेन असे दोन मॉडल आहेत. या मॉडेलद्वारे वेळीच माहिती कळू शकेल.