गुगलवर ‘मॅपिंग’ अ‍ॅप ब्लॉक; हिंदुस्थानच्या सीमारेषा चुकीची दाखवल्याने कारवाई

मॅप्स मी’ या मॅपिंग अ‍ॅपवर कारवाई करण्यात आलीय. ‘मॅप्स मी’ अ‍ॅपवर हिंदुस्थानच्या सीमारेषा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत होत्या. त्यामुळे गुगल आणि अॅपलने प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरमधून ते हटवले आहे. सरकारने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई झालीय.

डिसेंबर 2024 मध्ये सर्व्हे ऑफ इंडिया (एसओआय) आयटी कायद्यान्वये गुगलचे नोडल अधिकारी प्रियदर्शी बॅनर्जी यांना नोटीस पाठवली होती. अ‍ॅपमध्ये केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू- कश्मीर आणि लडाखच्या सीमा भौगौलिकदृष्टय़ा चुकीच्या दर्शवल्या जात होत्या. देशाच्या बाह्य सीमांना चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याने देशाची सार्वभौमिकता आणि अखंडतेला धोका निर्माण होतो. असे करणे कायद्याने गुन्हा आहे.