![balasaheb thackeray Art Competition](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/balasaheb-thackeray-Art-Competition-696x447.jpg)
शिवसेना दक्षिण मध्य विभाग व शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून आयोजित सांस्पृतिक, कला, खेळ महोत्सवाअंतर्गत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत चेंबूर, अणुशक्तीनगर, शीव, वडाळा, धारावी आणि माहीम या सहा विधानसभा क्षेत्रांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी मोफत होती.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कल्पकतेच्या जोरावर अप्रतिम चित्रकृती साकारल्या. परीक्षकांनी मुलांच्या कलेचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील विजेते – माहीम विधानसभा ः गट – 1 (इयत्ता 1 ते 2) 1) ओवी प्रकाश सूर्ये – निसर्ग 2. आमायरा संजय सुतार – निसर्ग गट – 2 (इयत्ता 3 ते 4) 1) प्रसाद प्रमोद ठोंबरे – मला पडलेले स्वप्न 2) मैत्रेय दळे – माझा आवडता छंद. गट – 3 (इयत्ता 5 ते 6) 1) आराध्य गणेश गुप्ता – निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा 2. प्रांजल निलेश हिर्डेकर – स्वच्छ भारत, सुंदर भारत. गट – 4 (इयत्ता 7 ते 8) ः 1) तेजस्वी मोघेश गावडे – भारतासाठी माझे डिजाइन 2) अवधूत श्रीरंग धारणकर – पर्यावरण जागरूकता. गट – 5 (इयत्ता 9 ते 10) 1) निल राहुल काटे – अतुलनीय भारत 2) आयुष संतोष मांगोकर – स्वातंत्र्य चळवळ धारावी विधानसभा ः गट – 1 (इयत्ता 1 ते 2) ः 1) ऋद्ध प्रबोध हुमणे – मी फुलपाखरू 2) अंजली मारुती कांबळे – भारतीय सण. गट – 2 (इयत्ता 3 ते 4) ः 1) शीतल यादव – भारतीय सण. 2) सायरा खान – भारतीय सण. गट – 3 (इयत्ता 5 ते 6) ः 1) सायना खान – स्वच्छ भारत, सुंदर भारत, 2. तव्हाकिया चौधरी – स्वच्छ भारत, सुंदर भारत. गट – 4 (इयत्ता 7 ते 8) ः 1) संकेत विनायक वायंगणकर – भारतासाठी माझे डिजाइन. वडाळा विधानसभा ः गट – 1 (इयत्ता 1 ते 2) ः 1) सात्विक मंगेश दळवी – भारतीय सण 2. ध्रुवी गाडकर – माझा छंद. गट – 2 (इयत्ता 3 ते 4) ः 1) कार्तिक तेली – माझे स्वप्न. गट – 3 (इयत्ता 5 ते 6) ः 1) स्मित शेखर मोरे – स्वच्छ भारत, सुंदर भारत. गट – 4 (इयत्ता 7 ते 8) ः 1) दुर्वेश अंकुश रांजे – पर्यावरण जागरूकता. शीव-कोळीवाडा विधानसभा ः गट – 1 (इयत्ता 1 ते 2) ः 1) संस्पृती अनमोल जाधव – निसर्ग 2) शॉर्ली निशांत कॅनी – निसर्ग 3) रेणुश रामदास कांबळे – राजेंद्र भिसे. गट – 2 (इयत्ता 3 ते 4) ः 1) वेद गणेश ढोके – भारतीय सण. गट – 3 (इयत्ता 5 ते 6) ः 1) आरुष मंगेश काळपुर्णी – स्वच्छ भारत, सुंदर भारत. गट – 4 (इयत्ता 7 ते 8) ः 1) निधिश्री देवेंद्र करामपुरी – मुले वाचवा, देश वाचवा.